मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. असे असले तरीही जगभरात २०२२ चे स्वागत जल्लोषात आणि नवीन आशेने केले असून देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी देखील सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले आहेत की,’थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2021
दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी देखील नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या असून ते म्हणाले आहेत की,’सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे, भरभराटीचे, सुख, शांती, समृद्धीचे जावो.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण
- ज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<