fbpx

Let’s Talk : कसा फोफावतोय शहरी नक्षलवाद (माओवाद) ?

टीम महाराष्ट्र देशा- गेली काही वर्षे नक्षलवाद, माओवाद याच्याबरोबरीने शहरी नक्षलवाद हा शब्द सातत्याने चर्चेत येतो. हाच मुद्दा घेऊन आम्ही माओवादाच्या अभ्यासक माजी लष्करी अधिकारी  कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी आम्ही संवाद साधला. नक्षलवाद्यांची (माओवाद्यांची ) 4th जनरेशन वॉर फेअर ही युद्धपद्धतीची काय आहे?नक्षलवादी विचारसरणीकडे युवक आकर्षित होत आहेत यामागची कारण काय?नक्षलवाद्यांची सम्पूर्ण यंत्रणा कशी चालते ?जंगलातील नक्षलवादी आणि शहरी नक्षलवादी यामधील नेमका फरक काय? शहरी नक्षलवादी नेमकं काय करतात? कबीर कला मंच चे नाव नेहमी समोर येते यात नेमका त्यांचा रोल काय?आणि अश्या इतर संघटना किती आहेत? सोशल मीडियाचा वापर हि मंडळी कसा करतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे Let’s talk या आमच्या विशेष कार्यक्रमात गायकवाड यांनी दिली.

आदिवासी भागातील नक्षलवादय़ांशी लढताना आपला शत्रू कोण हे तरी जवानांना माहित असते मात्र शहरांमध्ये नक्षलवादाचा वा नक्षल-समर्थकांचा फैलाव कितपत आहे, हे त्यांच्या समर्थकांवर छापे घालूनही पुरेसे स्पष्ट नाही. नक्षलवाद हा आज फक्त जंगलापुरता सीमित राहिला नसून त्याचे लोण शहरी भागात देखील पोहचले असल्याचे वेगवेगळे दाखले कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी या चर्चेत दिले.

पहा हि विशेष मुलाखत