Video: #justiceforasifa : “राजकारण थांबवा, आसिफाला न्याय द्या”

टीम महाराष्ट्र देशा- सध्या देशभरात जम्मू-काश्मीर येथील 8 वर्षांच्या बलिकेवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे.राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सेलिब्रिटी,तरुणाई मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहे.नेमकं काय वाटतंय तरुणाईला हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.आमच्या ‘लेट्स टॉक’ या विशेष कार्यक्रमात हिना कौसर खान , संध्या सोनवणे,अक्षय बिक्कड,संकेत देशपांडे या तरुणाईच्या प्रतिनिधींनी आपली बिनधास्त मते व्यक्त केली.

 

काय आहे प्रकरण ?
10 जानेवारीला असिफा खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानूष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली.शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला असिफाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली.17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला.

या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली.संजी रामला मदत करणं आणि असिफावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्यानं देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी