“पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की, पेंग्विन पण तिथेच आणि मातोश्री…”, अमेय खोपकरांनी साधला अमोल मिटकरींवर निशाणा
मुंबई: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. कधीकाळी एकमेकांवर कडाडून टीका करणारे आज मात्र गुण्या गोविंदाने सरकार चालवताना दिसून येतात. मात्र अगोदर बोललेली विधाने यांवरून आजही विरोधी पक्ष मविआ नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येतो. आज मनसे नेते अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करून टीका केली आहे.
“राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा आठवतोय का कुणाला? अबब..केवढं ते भाषेचं तेज पण ती सगळी निघाली बोलाचीच कढी. असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव. पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे. जिजामाता उद्यानात रंग बदलणाऱ्या या सरड्यासाठी वेगळं दालन करणार आहेत म्हणे!”, अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.
या व्हिडिओमध्ये अमोल मिटकरी मंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल करताना दिसून येत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. मात्र आज शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार आहे. यावरूनच रंग बदलणारा सरडा अशी उपमा देत अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांना पुन्हा असे चुरुचुरु बोलून दाखवा असे आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: ‘शॉने आमच्यासाठी काम सोपे केले’; सामना विजयानंतर क्विंटन डी कॉकचे मोठे वक्तव्य
“मुंबई केंद्रशासित करण्याचे सोमय्या आणि भाजपचे षडयंत्र”, संजय राऊतांचा मोठा दावा
IPL 2022: ‘त्याने मला बाल्कनीत लटकवलं आणि…’ मुंबईच्या खेळाडूबाबत युझवेंद्र चहलाचा धक्कादायक खुलासा!
विजय सत्याचाच होईल! संजय राऊत यांचा पुन्हा भाजपला इशारा
IPL 2022: लखनऊकडून पराभवानंतर ऋषभ पंत निराश, म्हणाला ‘शेवटच्या चेंडूपर्यंत…’