fbpx

राणीच्या बागेचे काम लवकर सुरु करण्यासाठी मुंबई महापालिकेला निर्देश देऊ- मुख्यमंत्री

given the status of freedom fighters

मुंबई: भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयासाठी आरक्षित असलेली 50 टक्के जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे राणीच्या बागेचे काम लवकरात लवकर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला  उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ई-वॉर्डच्या मंजूर विकास आराखड्यास भूकर क्र. 593 क्षेत्र धारण करणाऱ्या जमीनीवरील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचा विस्तार या आरक्षणामध्ये फेरबदल मंजूर झाला आहे. त्यानुसार निव्वळ आरक्षित क्षेत्राच्या 50 टक्के जमीन उद्यान विस्तारासाठी आरक्षित ठेवलेली आहे. विकास योजनेमध्ये आरक्षित असलेल्या क्षेत्राचा ताबा महापालिकेला देण्यात आला आहे.