मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. असे असले तरीही जगभरात २०२२ चे स्वागत जल्लोषात आणि नवीन आशेने केले असून देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले आहेत की,’सर्व नागरिकांना २०२२ या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! २०२१ हे वर्ष आपल्या सर्वांसाठी विविध आव्हानांचे गेले. या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने जगण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया.’
सर्व नागरिकांना २०२२ या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! २०२१ हे वर्ष आपल्या सर्वांसाठी विविध आव्हानांचे गेले. या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने जगण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया. pic.twitter.com/pNOXIoRHum
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 1, 2022
दरम्यान, नववर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस हा अन्नदात्याला समर्पित केला असून पीएम किसान योजनेचा २,००० रुपयांचा १० वा हप्ता नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<