भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो आपल्या नव्या सीजनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हजर झाला आहे. काल दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी बिग बॉस 16 (Big Boss 16) ने आपल्या ग्रँड प्रीमियर सह नव्या सीझनची धमाकेदार सुरुवात केली. या नव्या सीझनची लोक आतुरतेने वाट बघत होते. या नव्या बिग बॉस हाऊस मध्ये कोणते कोणते चेहरे चमकणार आहेत याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. काल ग्रँड प्रीमियर मध्ये सगळे चेहरे समोर आले. चला तर मग जाणून घेऊया कोण कोण आहे बिग बॉस हाऊसचे या सीजनचे मेंबर:
शिव ठाकरे
बिग बॉस मराठी सीजन 2 चा विजेता शिव ठाकरे या वर्षी बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे. तो एक पक्का स्पर्धक असून सर्वांना टक्कर देण्यासाठी सुसज्ज आहे. कारण इतर स्पर्धकांच्या तुलनेत शिवला ही स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तो एक पक्का स्पर्धक ठरू शकतो.
साजिद खान
बॉलीवूडमधील चित्रपट निर्माता साजिद खान देखील बिग बॉस 16 चा सदस्य आहे. शोमध्ये एन्ट्री करताना साजिदने असे दाखवले की, तो बिग बॉस 16 चा होस्ट आहे. पण असे नसून साजिद या घरातील एक सदस्य म्हणून यामध्ये भाग घेत आहे.
अंकित गुप्ता आणि प्रियंका चाहर चौधरी
कलर्स टीव्ही वरील लोकप्रिय सिरीयल ‘उदारीया’ मधील सर्वांची आवडती जोडी म्हणजे अंकित गुप्ता आणि प्रियंका चाहर चौधरी. या सिरीयल मध्ये या दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. ते दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहे असा खुलासा त्यांनी शोमध्ये केला आहे.
निमृत कौर अहलूवालिया
बिग बॉस ग्रँड प्रीमियरच्या स्टेजवर सर्वात पहिले एन्ट्री करणारी स्पर्धक म्हणजे निमृत कौर अहलूवालिया. कलर्स टीव्हीवरील ‘छोटी सरदारनी’ या मालिकेमध्ये निमृत मुख्य भूमिकेत दिसली होती. सलमान खान सोबत स्टेजवर डान्स करत निमृतने शोमध्ये धमाकेदार एन्ट्री केली.
MC स्टेन
प्रसिद्ध गायक आणि हीप-हॉप रॅपर अल्ताफ शेख उर्फ MC स्टेन देखील बिग बॉस 16 चा सदस्य आहे. शोमध्ये एन्ट्री केल्याबरोबरच त्याने सांगितले की यावर्षी तो शोमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. MC स्टेनने देखील त्याच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल स्टेजवर सांगितले.
गौतम विग
टेलिव्हिजनचा हृतिक रोशन म्हणजेच गौतम विक बिग बॉस 16 च्या घरामध्ये दिसणार आहे. ग्रँड प्रीमियर मध्ये गौतम ने आपल्या स्टाईल मध्ये एन्ट्री करून सलमान खानला एम्प्रेस केले.
अब्दु रोजीक
सलमानच्या मैने प्यार किया चित्रपटातील लोकप्रिय गाणे दिल दिवाना गाऊन अब्दु रोजिक याने स्टेजवर एन्ट्री केली. अब्दु रोजीक गायक असल्या सोबतच एक बॉक्सर देखील आहे असे त्याने स्वतःची ओळख करून देताना सांगितले .
अर्चना गौतम
हसीना पारकर चित्रपटातील अभिनेत्री अर्चना गौतम देखील बिग बॉस 16 च्या घरात आपल्याला दिसणार आहे. तिचा एकदा प्रेमभंग झाला असून ती या शोमध्ये कुणाच्याही जवळ जाणार नाही असे तिने सांगितले.
सौंदर्य शर्मा
प्रोफेशनल मॉडेल आणि डेंटिस्ट सह भोजपूरी अभिनेत्री असलेली सौंदर्य शर्मा सुद्धा बिग बॉस 16 च्या घरामध्ये आहे. तिने वेब सिरीज मध्ये काम केले असून पवन सिंगच्या ‘तुमचे कोई प्यारा’ या गाण्याची दिसली आहे.
शालीन भानोत
सलमान खान सारखा सुपरस्टार बनायची इच्छा व्यक्त करत शालीन भानोत याने बिग बॉस 16 च्या स्टेजवर एन्ट्री केली. सलमान खान जर बिग बॉस होस्ट करणार नसेल तर त्याच्या जागी मी शो होस्ट करू शकतो अशी इच्छा शालीनने व्यक्त केले.
श्रिजीता डे
टेलिव्हिजन वरील लोकप्रिय सिरीयल ‘उतरण’ फेम क्षितिजा डे ने शो मध्ये एन्ट्री केली. क्षितिजा आणि टीना एकमेकांच्या खास मैत्रिणी आहे असे त्यांनी स्टेजवर सांगितले.
मान्या सिंग
मिस फेमिना इंडिया 2020 ची रन-अप मान्या सिंग देखील बिग बॉस 16 च्या घरामध्ये दिसणार आहे.
गौरी नागोरी
राजस्थान मधील प्रसिद्ध डान्सर गौरी नागोरी देखील बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे. जिने येताच आपल्या नृत्याने मंचावर आग लावली.
सुंबुल तौकिर
स्टार प्लस वरील लोकप्रिय सीरियल ‘इमली’ मधील फेम सुंबुल तौकिर देखील बिग बॉस हाऊस मध्ये एन्ट्री करत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | “शिंदे गटात सामील व्हा, नाहीतर तडीपार करून एन्काउंटर…”; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला धमकी
- Shivsena | “… आमदारांसह काँग्रेसमध्ये येतो, गृहमंत्रिपदासह उपमुख्यमंत्रिपद द्या”, शिवसेनाचा एकनाथ शिंदेंबाबत मोठा गौप्यस्फोट
- Shivsena | “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा एकनाथ शिंदेंवर हल्ला
- Government Job Alert | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या 990 रिक्त पदांसाठी भरती प्रकिया सुरू
- Nitesh Rane | “आता देवी सरस्वती सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही”, नितेश राणेंचा छगन भुजबळांवर घणाघात