आघाडीच निमंत्रण आल्यावर बघू; महाआघाडीसाठी राज ठाकरेंच ‘वेट अँड वॉच’

पुणे :  अजून निवडणुकांना वेळ आहे, अद्याप मला कोणाकडूनही आघाडीसाठी बोलणं झालेलं नाही. त्यामुळे येत्या काळात आघाडी करण्यासाठी निमंत्रण आल्यावर बघू म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र आणि राज्यातील सत्तेत असणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांची महाआघाडी उभारण्याची तयारी विरोधकांकडून सुरू करण्यात आली आहे. अनेकवेळा मनसे देखील या आघाडीत सहभागी होणार असल्याचे बोललं जातं. मात्र, खुद्द राज ठाकरे यांनी आता या केवळ चर्चाच असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्र हा गुजरात चालवत असल्याची टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. राम मंदीर हे झालं पाहिजे पण याला निवडणुकीचा मुद्दा बनवू नये, चार वर्षातला विकास दाखवत येत नाही म्हणून भगवत गीता वाटणे आणि राम मंदिराचा मुद्दा पूढे केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच आजवर अनेक कारसेवक मारले गेले, पण आता बहुमताचे सरकार असतानाही मंदिर बांधले जात नसल्याचंही ते म्हणाले.

राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी पालक ‘कृष्णकुंज’वर