‘चलो दिल्ली’ शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर जमण्याचं आवाहन

‘चलो दिल्ली’ शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर जमण्याचं आवाहन

farmers

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आता पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ चा नारा दिला आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी दिल्लीच्या सीमारेषेवर हजर राहण्यासाठी आवाहन केलं आहे.

दरम्यान महिन्याच्या सुप्रीम कोर्टाने आंदोलनाच्या अधिकारासंबंधी तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा हक्क आहे का? यासंबंधी तपासून पाहणार असल्याचे म्हटले होते. तसेच तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी न्यायालयात आला आहात, तर सत्याग्रह कशासाठी करता? न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही का? शहराला घेरल्यामुळे शहरांचा श्वास कोंडला आहे, आता तुम्हाला शहरांमध्ये येऊन कशासाठी आंदोलन करायचे आहे? असे सवाल हायकोर्टाने केले होते. त्यातच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी चलो दिल्ली ची हाक दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केल्याने दिल्लीच्या आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची ‘महापंचाईत’ झाली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सत्याग्रह करण्याची परवानगी मागण्यासाठी ‘किसान महापंचायत’ या शेतकऱ्यांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘किसान महापंचायत’ हा गट शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेला नाही. या गटाने रस्ते अडवलेले नाहीत. वास्तविक, पोलिसांनीच रस्ते अडवलेले आहेत, शेतकऱ्यांनी महामार्गावर अडथळे निर्माण केलेले नाहीत, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या