सोलापूर (प्रतिनिधी)- दक्षिण आणि उत्तर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना शासनाकडे पाठपुरावा करुन त्वरित नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही आ. सुभाष देशमुख यांनी देत ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी आ. देशमुख यांनी गावकऱ्यांची राहण्याची आणि खाण्याची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
आ. देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील चंद्राळ, उत्तर तालुक्यातील तिर्हे, शिवणी, तेलगाव, पाकणी, नंदूरसह इतर भागात जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अमोल कुंभार, हत्तूरचे सरपंच धर्मा राठोड, प्रशांत सलगर, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या भागात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अनेक महिलांना शेताचे नुकसान झाल्याचे सांगताना अश्रू अनावर झाले होते. यावेळी आ. देशमुख यांनी महिलांना धीर देत शासनाकडे पाठपुरावा करून मदत देण्याचे आश्वासन दिले.
चंद्राळ गावातील ग्रामस्थांची व्यवस्था हत्तूर येथील जि.प. शाळेत करून त्यांची जेवण्याची, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले तसेच झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासही अधिकाऱ्यांना सांगितले. याशिवाय आ. देशमुख यांच्या सूचनेनुसार बचाव कार्यासाठी महसूल, पोलिस विभागाची पथके आणि एनडीआरएफची टीम विविध भागात पाठवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘यशोमती ठाकूर यांनी जे काही दुष्कृत्य केले तो म्हणजे निव्वळ आणि निव्वळ सत्तेचा माज होता’
- निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धवजी आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत : मनसे
- ‘लोकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा’
- सरकारने अहमदनगर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा- शिवाजी कर्डिले
- कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<