‘पहिल्या दिवसाची कसर दुसऱ्या सामन्यात पूर्ण करू’ ; श्रीलंकेच्या खेळाडूचे भारताला आव्हान

karunaratne

श्रीलंका : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर मात करत दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत अगदी सहज पार केले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत ५० षटकात श्रीलंकेने ९ गडी गमावत २६२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३७व्या षटकात ३ गडी गमावत हे अव्हान सहज पार केले. यासह तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली.

दरम्यान या सामन्यानंतर श्रीलंकेचा खेळाडू करुणारत्ने म्हणाला की, श्रीलंका संघात 300 ते 350 धावा बनवण्याचे सामर्थ्य आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आम्ही याकडेच देणार असल्याचं त्याने यावेळी सांगितलं. मीडियाशी बोलाताना तो म्हणाला, “आमच्या फलंदाजानी सुरुवातीला चांगला खेळ केला. पण पुढे तसा खेळ ते कायम कायम ठेवू शकले नाहीत. मी कर्णधार दासुनला 42 आणि 43 व्या ओव्हरमध्ये मोठे शॉट्स खेळूका असे विचारले देखील होते. पण त्याने 45 ओव्हरनंतर खेळण्याचा सल्ला दिला. आमचे इतरही फलंदाज चांगली खेळी करु शकले असते तर आम्ही नक्कीच 300 ते 350 पर्यंतचा खेळ करु शकलो असतो.”

महत्त्वाच्या बातम्या

IMP