शिवस्मारकाच्या कामात अनियमितता,विनायक मेटेंच्या पत्रामुळे खळबळ

टीम महाराष्ट्र देशा- शिवस्मारकाच्या कामात अनियमितता असून त्याची चौकशी करा अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. ही मागणी सध्या केलेली नसून दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या पत्रातून करण्यात आली होती. शिवस्मारकाच्या अनियमिततेची चौकशी करा, अन्यथा मला विधान परिषदेत अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणावा लागेल असं विनायक मेटे यांनी पत्रात म्हटलं आहे.

काय आहे पत्रात ? –
कंपनीने प्रकल्पाची किंमत कमी न करता निविदेत बदल करून किंमत कमी केल्याचे भासवले.
– बदलांनुसार भरावाची भिंत कमी करणे, समुद्राची भिंत (तटबंदी) कमी करणे, ब्रेक वॉटर वर जेट्टी उभारणे, पुतळ्याची लांबी-रुंदी-उंची आणि तलवारीची उंची कमी केल्याची कबुली.
– या बदलास प्रशासकीय व तांत्रिक समितीची मान्यता नाही.
– स्मारकाची उंची 210 मीटरहून 212 मीटर पर्यंत म्हणजेच 2 मीटरने वाढवून 81 कोटी अधिक जीएसटी कोणाच्या परवानगीने वाढवण्यात आली.
– शिवस्मारक कृती व समन्वय समिती आणि मुख्यमंत्र्यांना या सर्व बदलांपासून अंधारात ठेवल्याची केली तक्रार.
– सल्लागार आणि काँट्रॅक्टर यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक नियमबाह्य बाबी केल्याचे निदर्शनास आल्या.
– विभागीय लेखापालांच्या निरीक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून प्रकल्पाची पुढील वाटचाल अडचणीची ठरणार.
– अर्थपूर्ण बाबी डोळ्यासमोर ठेऊन कंपनीला अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर देण्याची घाई. – यामुळे प्रकल्पाला भविष्यात कायदेशीर व आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेल व शासनास मोठा भुर्दंड बसेल.
– सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव आणि सचिवांनी कार्यरंभ आदेश (वर्क ऑर्डर) देताना अनेक बदल केले व याबाबत समितीला विश्वासात घेतले नाही.
– मंत्रालयीन पातळीवरून इतर अधिकऱ्यांवर दबाव टाकून, दहशतीखाली अनियमित बाबी असतांना वर्क ऑर्डर व ऍग्रिमेंटवर (करारनामा) सह्या घेतल्या.

छत्रपतींना दुजाभाव कोण दाखवत असेल तर खपवून घेणार नाही – अजित पवार

‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको’

व्यंगचित्रकार राज ठाकरे ‘पार्टटाइम’ राजकारणाला आतातरी सिरियसली घेणार का?