fbpx

‘हेलिकॉप्टर एला’तून काजोल करणार कमबॅक

 टीम महाराष्ट्र देशा : सध्या काजोलच्या ‘हेलिकॉप्टर एला’ या चित्रपटाची चांगली चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या खट्याळ स्वभावामुळे प्रत्येक चित्रपट गाजविणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चंदेरी दुनियेमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. काजोलने गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती लवकरच आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अभिनेता अजय देवगणने करणार असून याआधी अजयने ‘राजू चाचा’, ‘ब्लॅकमेल’,‘यु मी और हम’ ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलेच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून गायिका होण्यासाठी या महिलेला जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये काजोल सोबत रिद्धी सेन ही झळकणार आहे.

दरम्यान, अजय देवगणबरोबरच जयंतीलाल गडा हे देखील या चित्रपटाची निर्मितीमध्ये हातभार लावणार असून प्रदीप सरकार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रदीप सरकार यांनी ‘मर्दानी’,’परिणीता’,’लफंगे-परिंदे’, ‘लागा चुनरी में डाग’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले आहे. ‘हेलिकॉप्टर इला’ येत्या १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ऋषी कपूरच्या बहुचर्चित ‘मुल्क’ चा ट्रेलर रिलीज

जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी

मराठीचा मला अभिमान-अजय देवगण; अजय झळकणार मराठी चित्रपटात