fbpx

मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय टीम सज्ज

 टीम महाराष्ट्र देशा : इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेतील पहिल्या सामना खिशात घातल्यानंतर विराट कोहली ची टीम पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड-भारत या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. आजचा सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन्सवर आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता सुरु होईल.

इंगलंड-भारत टी-२० मालिका तीन सामन्यांची आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात कोहलीच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली.टी-20 मध्ये सर्वात जलद 2 हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीने या सामन्यात केला. कोहलीने 56 डावांमध्ये ही किमया साधली.

सर्वांचा लाडका महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 33 व्या यष्टीचीत फलंदाजाची नोंद केली. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त यष्टीचीत बळी घेण्याचा मान आता धोनीच्या नावावर आहे. धोनीने पाकिस्तानच्या कामरान अकमलचा विक्रम मोडला. अकमलने यापूर्वी 32 यष्टीचीत बळी घेतले आहेत.

पहिल्या सामन्यात लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि कुलदीप यादवनं घेतलेल्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने इंगलंडला ८ विकेट्सने मालिका जिंकली होती. इंग्लंडवर मिळालेल्या विजयाने भारतीय टीमचं मनोधर्य उंचावले आहे.

हा विक्रम करणारा ‘शिखर धवन’ पहिला भारतीय क्रिकेटपटू

अंतिम कसोटी : हार्दिक पांड्याचे धमाकेदार शतक