ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि टी-20 साठी भारतीय संघाची घोषणा

वाचा कुणाचं झालं कमबॅक आणि कुणाला मिळाला डच्चू ?

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या टी-20 संघात महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक झालं आहे, तर वन डे संघात हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालंय. यजुवेंद्र चहलचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. टी-20 संघातून श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना वगळण्यात आलंय.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात धोनी अखेरचा खेळला होता. मात्र, त्याची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्याला 2018 मध्ये 13 डावांत 25च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. पदार्पणानंतरची त्याची ही सर्वा निच्चांक कामगिरी आहे. मागील सात आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अनुक्रमे 23, 7, 20, 36, 8, 33 व 0 धावा केल्या.

bagdure

असा असेल संघ
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे संघ-  विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

You might also like
Comments
Loading...