रायगड जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 241 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर

टीम महाराष्ट्र देशा- रायगड जिल्हयातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सरकारनं 241 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे . सरकारनं रायगड जिल्हयातील तब्बल 50 पर्यटनस्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून मुरूड आणि अलिबाग परिसरातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सर्वाधिक म्हणजे 137 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात, मात्र तरीही जगातील सर्वात उंच स्मारक ठरणार

अलिबाग तालुक्यातील कुलाबा किल्ला, मांडवा किनारा, किहिम बीच, नवगाव किनारा तसेच खांदेरी-उंदेरी हे जुळे किल्ले विकसित केले जाणार आहेत. माथेरानसाठी या आराखडयात 19 कोटी 91 लाख रूपयांची तरतूद केली गेली आहे. श्रीवर्धन किनाऱ्याच्या विकासासाठीही 19 कोटी 5 लाख रूपयांची तरतूद कऱण्यात आली आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या मुरूड-अलिबाग विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश मोहिते यानी दिली आहे.

जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता- मोहन भागवत

You might also like
Comments
Loading...