मेळघाटातील आदिवासी महिला बांधणार मोदींना बांबूची राखी

pm-modi

टीम महाराष्ट्र देशा : मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित रक्षाबंधन सोहळ्याचे निमंत्रण या केंद्रास मिळाले आहे. या सोहळ्यात कोरकू महिला कारागिरांकडून पंतप्रधान बांबूची राखी बांधून घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर पहिल्यांदाच मेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे, बांबूपासून तयार केलेली पर्यावरणपूरक राखी बांधत असतानाच मेळघाटातील महिलांची कैफियत देखील त्या पंतप्रधानांसमोर मांडणार आहेत.

‘देशासाठी झटलेल्या इतरांचे महत्त्व गांधी परिवाराचे महत्त्व वाढावे म्हणून कमी केले’