सई ताम्हणकरच्या ‘सईहोलिक्स’ फॅन क्लबला झाली पाच वर्ष पूर्ण, सईने फॅन्सना भेट दिली रोपटी

टीम महाराष्ट्र देशा : मराठी सिनेसृष्टीतली सई ताम्हणकर ही एकमेव अभिनेत्री आहे जिचा फॅनक्लब गेली काही वर्ष सामाजिक जीवनात कार्यरत आहे. सईहोलिक्स फॅनक्लब सई ताम्हणकरवर मनापासून प्रेम करतो. सईहोलिक्स सईचे फक्त सिनेमेच पाहत नाही तर तिच्या विचारसरणीचेही अनुसरण करणारा हा फॅनक्लब आपल्या आवडत्या अभिनेत्रीची वर्षातून एकदातरी भेट घेतोच. आणि ह्या स्नेहसंमेलनाला सईचे देशाच्या कानाकोप-यातले फॅन्स तिला भेटायला येतात.

कतारमध्ये झालेल्या धुरळाच्या प्रीमियरनंतर सईहॉलिक्सने नुकतीच सई ताम्हणकरची भेट घेतली. ह्या छोटेखानी गेट-टूगेदरला मुंबई, वर्धा, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले तसेच गुजरात आणि इतर राज्यांमधले फॅन्सही पुण्यात आले होते. सईहोलिक्स फॅनक्लबला आता पाच वर्ष झाली आहेत, त्याचेही सेलिब्रेशन करण्यात आले.

Loading...

सूत्रांच्या अनुसार, ग्लोबल स्टार सई ताम्हणकरला महागड्या भेटवस्तूंपेक्षा जिव्हाळ्याने दिलेली छोटीशी गोष्टही आवडते. हे तिच्या चाहत्यांना माहित आहे. त्यामूळे सईहोलिक्स फॅनक्लबच्या अनेकांनी हँडमेड गिफ्ट्स सईसाठी आणली होती. निसर्गप्रेमी सईनेही आपल्या चाहत्यांना रोपटी भेट दिली.

ह्या सेलिब्रेशनवेळी अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, ”सईहोलिक्स हे माझं कुटूंब आहे. त्यांना दरवेळी भेटताना मला खूप आनंद होतो. मला भेटायला माझे चाहते दूर-दूरवरून येतात, ह्याचं मला खूप अप्रुप आहे. सईहोलिक्सना दरवेळी भेटल्यावर एक नवी एनर्जी घेऊन मी जात असते. अधिकाधिक चांगलं काम करण्याची उर्जा मला त्यांच्याकडून मिळते.”

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले