कॉंग्रेसचे नाराज आमदार गोरंट्याल भाजपच्या वाटेवर ?

जालना : कॉंग्रेस पक्षात एकनिष्ठ राहत पक्षाला बळकटी देऊनही मंत्रिमंडळात संधी न दिल्याने नाराज असलेले कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सूरू झाली आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या स्तुती केली. यामूळे दानवे यांनी गोरंट्याल यांच्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला आहेत. यामूळे लवकरच कैलास गोरंट्याल भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामूळे संपुर्ण जिल्हा भाजपमय होईल.

महाविकास आघाडीच्य सरकार मध्ये जालना जिल्ह्यातून केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राजेश टोपे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांच्या मंत्रीपदानंतर सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात गोरंट्याल यांनी दानेवची स्तृती केली.यामूळे कार्यक्रमास उपस्थिती असलेल्यां अनेकांच्या भुवया उंचावल्या. या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, सुरेश जेथलिया, भास्कर दानवे, राजेश राऊत, शिवसेनेचे भास्कर अंबेकर या सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होते. श्री. गोरंट्याल यांनी जालना जिल्ह्याच्या विकासात रावासाहेब दानवे यांचे अन्य नेत्यापेक्षा अधिक योगदान कसे आहे, याविषयीचा उहापोह करीत थेट शिवसेनेकडे इशारा केल्याचे मानले जात आहे.

Loading...

जिल्ह्याच्या विकास कामासाठी श्री. दानवे यांनी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याचे सुतोवाच श्री. गोरंट्याल यांनी याच कार्यक्रमात केल्याने कॉंग्रेस-शिवसेनेच्या उपस्थितीत नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी श्री. दानवे यांच्यावर निष्क्रिय असल्याची टीका केली जात असे. पंरतू गेल्या पाच वर्षात श्री. दानवे यांनीच जिल्ह्यात बडे प्रकल्प उभारून कोट्यावधी रूपयांचा निधी दिल्याने जालना शहराच्या विकासाचा आलेख उंचावल्याची कबुलीच श्री. गोरंट्याल यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात राजकारण करतांना श्री. गोरंट्याल शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे करीत असल्याची चर्चाही यानिमित्ताने रंगत आहे.

भाजपमध्ये जाण्याची अनेकदा ऑफर होती, पंरतु पक्षाशी एकनिष्ठ असल्याने पक्ष बदलला नसल्याचे श्री. गोरंट्याल यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे, असे असतानाही पक्षानी मंत्रिमंडळात समावेश न करून आपल्यावर अन्याय केल्यीाच भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. ही भावना ते अनेकदा बोलून दाखवित आहेत. गेल्या पाच वर्षात पालिकेला केंद्राच्या योजनेतूनच अधिकचा निधी मिळाल्याने शहराच्या विकासाचा वेग वाढल्याचा दावा करीत श्री. गोरंट्याल यांनी श्री. दानवे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले