भाजपच्या अडचणी वाढल्या,’या’ पक्षाने घेतला पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा- गोव्यामध्ये भाजपची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्रीकरांच्या आजारपणामुळे भाजपत अंतर्गत संघर्ष सुरू झाला असताना आता त्यांच्या मित्रपक्षानेही त्यांना अडचणीत टाकायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाने भाजपला धडा शिकवण्यासाठी मांद्रे आणि शिरोडा विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने त्यांच्या जागी मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्याला मुख्यमंत्री बनवावे अशी मगो पक्षाची मागणी आहे. सध्या मंत्रिमंडळात मगो पक्षाचे सुदीन ढवळीकर हे सर्वात ज्येष्ठ मंत्री असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे. मात्र या मागणीला भाजपने केराची टोपली दाखवल्याने मगो पक्षाची नाराजी वाढू लागली आहे.

अमित शहांच्या तीन तासांच्या मुंबई दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !

उपचारांसाठी पर्रीकर ‘एम्स’मध्ये दाखल,काही काळासाठी मुख्यमंत्री पद सोडणार