हातापाया पडतो पण मराठ्यानो आंदोलन मागे घ्या : चंद्रकात पाटील

टीम महाराष्ट्र देशा : काही पेड लोकं आंदोलनात घुसले असून आंदोलन करून गाड्या फोडून काय साध्य होणार आहे? असा सवाल महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षणाचा निर्णय हा आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळेल का ? असा देखील सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता. मात्र आता आक्रमक झालेलं आंदोलन पाहून चंद्रकांत पाटील यांनी आपला सूर नरम केला आहे मी हातापाय पडतो पण आंदोलन मागे घ्या , अस आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांना केलं आहे. तर वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच भावना दुखावल्या असतील माफी मागतो असे सुद्धा पाटील म्हणाले आहेत.
नेमके काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
काही पेड लोक आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत. 10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करुन उपयोग होणार नाही, मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय?

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

दरम्यान, काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या
– मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
– मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
– राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
– आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
– मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
– अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
– अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
You might also like
Comments
Loading...