fbpx

आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा! खडसेंचा भाजपला घरचा आहेर

eknath khadse

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. खडसेंनी आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान सरकारला फटकारले. सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं. असे खडसे म्हणाले.

जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे.एमबीबीएस नसतील, तर बीएमस डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश खडसेंनी उपस्थित केला.

आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, तर डॉक्टर पाठवतो म्हणतात, त्याला लागतात चार तास. तोपर्यंत १० जणांचे १०० होतात. हातात दगड घेऊन असतात, आम्ही काय करायचे ? असा प्रश्न खडसेंनी सभागृहात उपस्थित केला.