…तर संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करू : फडणवीस

sambhaji bhide and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : मनुचे गुणगान केल्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पुण्यातील जंगली महाराज मंदिरात धारकाऱ्यांना मार्गदर्शन करते वेळी त्यांनी केलेलं वक्तव्य अंगलट येणार असं चित्र निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज कारवाईचे संकेत विधानसभेत बोलताना दिले आहेत.

आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता असं विधान भिडे यांनी केले आहे.संभाजी भिडे यांनी मनुसंदर्भात घटनाविरोधी वक्तव्य केले असल्यास ते तपासून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

संभाजी भिडे यांचं वक्तव्य

आपल्या समाजाला गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे होता असं विधान भिडे यांनी केलं आहे. या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया येवू लागल्या असून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मनु ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्याही एक पाऊल पुढे : संभाजी भिडे

भाजपाध्यक्ष अमित शहा माऊलींच्या चरणी !