Breaking : एकमत झाल्यानंतरचं शिवसेनेला पाठींबा देऊ, आघाडीने घेतले अंग काढून

blank

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज वाय. बी. सी. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकी नंतर दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या चर्चेचा आढावा दिला आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जो पर्यंत पाठींब्याबाबत एकमत होत नाही तो पर्यंत कोणताही निर्णय घेणार नाही. कारण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक एकत्र लढले आहेत. त्यामुळे सत्तेतील वाटप कसे असणार यावर एकमत झाल की आम्ही निर्णय घेऊ.

तसेच अहमद पटेल म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काल पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना फोन करुन सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितला. पाठिंब्यासंदर्भात आज आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार यांच्याशी आम्ही बोललो. आता याबाबत काय तो निर्णय घेऊ. काही मुद्दे आमच्यातच स्पष्ट व्हायचे आहेत ते झाले की आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असंही अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या