fbpx

मोहोळ विधानसभेला आम्ही सांगेल तोच उमेदवार द्या : धनंजय महाडिक

सोलापूर : मोहोळ विधानसभेला भीमा लोकशक्ती परिवार सांगेल तोच उमेदवार राष्ट्रवादीने द्यावा, आम्ही त्याला तालुक्‍याच्या विकासासाठी निश्‍चित निवडून आणू, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

खासदार धनंजय महाडिक यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर आहे. तसेच त्यांना सलग तीन वेळा संसदपटू हा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे महाडिक यांचा भीमा लोकशक्ती कारखान्यावर सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत, ही पाटील यांची इच्छा आहे, यासाठीच त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले.

येणाऱ्या निवडणुकांत भाजप-सेना युती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत सेना-भाजप जरी टोकाची भाषा वापरत असले तरी ते त्यांचे अंतर्गत भांडण आहे, असेही महाडिक यावेळी म्हणाले.

2 Comments

Click here to post a comment