३१ डिसेंबरला रात्रभर बाजारपेठा सुरु राहू द्या, विदेशीसणांना विरोध करणाऱ्या शिवसेनेची मागणी

aditya thakarey

टीम महाराष्ट्र देशा : ३१ डिसेंबरला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बिगर रहिवासी भागामध्ये असणाऱ्या बाजारपेठा २४ तास खुल्या ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित हि मागणी केली आहे. दरम्यान, आजवर विदेशी सणांना विरोध करणाऱ्या शिवसेनेकडूनच ३१ डिसेंबर रोजी बाजारपेठा सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई येथील बिगर रहिवासी भागात असलेल्या बाजारपेठा नविन वर्षांच्या निमित्ताने २४ तास खुल्या ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी. त्यामुळे लोकांना खुलेपणाने नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद घेता येईल.अशी आपली आग्रहाची मागणी असल्याच पत्रात म्हंटले आहे.

 

या संदर्भातच २०१७ मध्ये मुंबई सारखी देशातील अन्य शहरे ही २४ तास चालू ठेवावीत असा प्रस्ताव विधीमंडळात मंजूर झाला होता मात्र गृह खात्याकडून त्या प्रस्तावावर अद्याप मंजुरी आलेली नाही याची देखील पत्रात आदित्य ठाकरेंनी आठवण करून दिली.त्यामुळे युवा ठाकरेंच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.