भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि मराठा समाजाचे नेतृत्व करा

pravin gaikwad press

पुणे : छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजाचे नेतृत्व करावं, असं मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केल आहे. मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी करण्यासाठी आता नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी जनतेची इच्छा असल्याचं गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनाला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील खासदार संभाजीराजे किंवा खासदार उदयनराजे यांनी नेतृत्व करण्याची गरज आहे. मात्र, सर्वात आधी संभाजीराजेंना खासदारकी सोडावी लागेल, तेव्हाच मराठा समाज त्याच्यावर विश्वास ठेवू शकेल असंही गायकवाड म्हणाले.

मराठा समाजाला कोणत्याही राजकीय नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही, सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचीही सरकारकडून कुचंबणा करण्यात आलेली आहे, त्यामुळे समाजातील नेतृत्वाची विश्वासहर्ता पणाला लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींच्या घराण्यातील खासदार संभाजीराजे किंवा खासदार उदयनराजे यांनी नेतृत्व करण्याची गरज असल्याचं प्रवीण गायकवाड म्हणाले.