मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडत असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर संभाजी राजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यात सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत या आणि कुणीही विरोधात बसा. पण राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरात लवकर संपवा आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवा”,असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे. ते जालन्यातील वडीगोद्री येथे बोलत होते. सध्या राज्यात अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील गोंधळ संपवून प्रलंबित प्रश्न प्रश्न मार्गी लावा असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता –
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळे आता या बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव देण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<