fbpx

सट्टाबाजार तेजीत; जाणून घ्या कोणाचं येणार सरकार

मोदी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुक आता जवळजवळ पार पडली आहे, केवळ निकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे आणि देशाचा भावी पंतप्रधान कोण होणार याकडे लागले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या निकालांवरुन सट्टाबाजारनेही चांगलीच रक्कम जमवली आहे.

आज लोकसभेच्या शेवटच्या आणि अंतिम टप्यातील मतदान पार पडत आहे. त्यानंतर बहुप्रतीक्षित निकाल जाहीर होणार आहे. त्यासाठी सट्टाबाजारात बुकींनी चांगलीच रक्कम लावली आहे. तर गुजरातमध्ये सट्टाबाजारात निकालांच्या जागेवरुन वेगवेगळे दर लावले आहेत.

सट्टाबाजारात भाजपचाचं बोलबाला असून 21 जागांसाठी 27 पैसे, 22 जागांसाठी 60 पैसे तर 23 जागांसाठी 1 पैसे असे दर ठरलेले आहेत. तसेच 24 जागांसाठी एक रुपया 80 पैशाच्या बदल्यात 2 रुपये 20 पैसे दर सुरु आहे. गुजरातमधील 26 जागांसाठी 7 पैशाच्या बदल्यात 8 रुपये 50 दर लावण्यात आला आहे.

पंतप्रधानपदासाठी सट्टाबाजारात नरेंद्र मोदी यांच्यावर 14 पैसे दर लावण्यात आला आहे, तर राहुल गांधी पंतप्रधान बनतील यावर 5 रुपये दर सुरु आहे. यंदाच्या मोसमात गुजरातमध्ये २०० कोटीपेक्षा अधिक सट्टा लावण्यात आला आहे. तर २०१४ च्या तुलनेत या निवडणुकीला कमी सट्टा लावण्यात आला आहे. २०१४ ला गुजरातमध्ये ५०० कोटी एवढा सट्टा लागला होता.

सट्टेबाजाराच्या अभ्यासानुसार सट्टाबाजारात ज्यांचे दर कमी त्यांची जिंकण्याची संधी जास्त असते असं मानलं जातं. तसेच सट्टाबाजारातील तर्कवितर्कांनुसार भाजपाला पसंती मिळत आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपची कामगिरी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपानेतृत्वातील एनडीएला सरकार बनविण्यासाठी बहुमत मिळणं कठीण आहे तर काँग्रेस आणि युपीएची स्थितीत जास्त सुधारणा नाही,असा देखील अंदाज लावला जात आहे.