मोहल्ला लायब्ररीतून मिळणार शिवरायांच्या कर्तृत्वाचे धडे

औरंगाबाद : परिसरातील मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, वाचन संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने शहरात दोन मोहल्ला लायब्ररी सुरू झाल्या आहेत. वडिलांच्या शिकवणीने प्रेरित होऊन मिर्झा मरियम या शालेय विद्यार्थिनीने आपल्या घराजवळ मोहल्ला लायब्रेरी नावाने वाचनालय सुरु केले आहे. तर रेहमानिया कॉलनी किराडपुरा येथील गल्ली नंबर ३ मध्ये सय्यद कलीम हाश्मी यांच्या घरी देखील शुक्रवारी (दि.२२) अजून एका मोहल्ला लायब्ररीचे उद्धाटन संपन्न झाले. अशाप्रकारच्या ३० वाचनालयांचे उद्धाटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मरियमचे वडील मिर्जा अब्दुल कय्युम नदवी हे रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ते विशेष उपक्रम राबवितात. त्यांची मुलगी मरियमकडे १५० पुस्तके होती तर वडिलांनी तिला १५० पुस्तके दिली होती. आपल्याकडील पुस्तकांचा परिसरातील गरिब मुलांनादेखील लाभ व्हावा या हेतूने तिने वडिलांना मला लायब्ररी सुरू करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

त्यांनीही होकार दिला. त्यातून ८ जानेवारी रोजी एकूण ३०० पुस्तकांची मोहल्ला लायब्रेरी सुरू करण्यात आली. या लायब्ररीचे उद्घाटन माजी मंत्री फौजिया खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिर्जा नदवी यांनी, भविष्यात रिड अँड लीड फाउंडेशन तसेच फेम या संस्थेमार्फत शहरात विविध भागांमध्ये जवळपास ३० वाचनालय उघडणार असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या