lenovo- लेनोव्होच्या थिंकपॅडची मालिका

लेनोव्हो कंपनीने भारतात इंटेलच्या प्रोसेसर्सने सज्ज असणारे थिंकपॅड या मालिकेतील विविध मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा केली आहे.

लेनोव्होने भारतात थिंकपॅड एक्स१ कार्बन, थिंकपॅड एक्स१ योगा, थिंकपॅड एक्स २७०, थिंकपॅड योगा ३७०, थिंकपॅड एल ४७०, थिंकपॅड टी ४७० व थिंकपॅड टी ४७०एस हे मॉडेल्स लाँच केले आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये इंटेलचा सातव्या पिढीतला कोअर आय-७ हा अत्यंत गतीमान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. या सर्व मॉडेल्समध्ये डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून ब्ल्यू लाईट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधाही असेल.

थिंकपॅड एक्स १ कार्बन:- या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. याची रॅम १६ जीबी आणि स्टोअरेज एक टिबी इतके असेल. बायोमेट्रीकशी संबंधीत बाबींसाठी यात फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात इंटेल थंडरबोल्ट ३, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एलटीई, एचडीएमआय, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी आणि डिस्प्ले पोर्ट देण्यात आले आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर रॅपीट चार्जींग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही ८० टक्के बॅटरी फक्त एका तासात चार्ज होते हे विशेष. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,२३,००० रूपयांपासून सुरू होणारे आहे.

थिंकपॅड एक्स १ योगा:-यामध्ये १४ इंच आकारमानाचा आणि २५६० बाय १४४० पिक्सल्स म्हणजेच डब्ल्यूक्युएचडी क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. हे मॉडेल कुणीही ३६० अंशात आपल्याला हव्या त्या पध्दतीने वापरू शकेल. यात मायक्रोसॉफ्टच्या सरफेस पेनप्रमाणे स्टायलस पेन वापरण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यात इंटेलचा सातव्या पिढीतील कोअर आय-७ हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला असून यात १६ जीबीपर्यंतच्या रॅमचे पर्याय आणि स्टोअरेज एक टिबी इतके असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात इंटेल थंडरबोल्ट ३, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एलटीई, एचडीएमआय, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी आणि डिस्प्ले पोर्ट देण्यात आले आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,४५,००० रूपयांपासून सुरू होणारे आहे.

थिंकपॅड योगा ३७०:- हे मॉडेल वजनाने अतिशय हलके असे असून ३६० अंशात आपल्याला हव्या त्या पध्दतीने वापरता येण्याजोगे आहे. विशेष म्हणजे हे टु-इन-वन या प्रकारातील असल्यामुळे लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही पध्दतीत वापरता येणार आहे. यातही स्टायलस पेनचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यात १३.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यातही इंटेलचा सातव्या पिढीतील कोअर आय-७ प्रोसेसर असेल. याची रॅम १६ जीबीपर्यंत तर स्टोअरेज एक टिबी इतके असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात इंटेल थंडरबोल्ट ३, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एलटीई, एचडीएमआय, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी आणि डिस्प्ले पोर्ट देण्यात आले आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ९६ हजारांपासून असेल.

थिंकपॅड योगा एक्स२७०:- यात १२.५ इंची डिस्प्ले एचडी आणि फुल एचडी या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याला खास करून हेवी युजर्ससाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे यात उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २१ तासांपर्यंत वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यातही इंटेलचा सातव्या पिढीतील कोअर आय-७ प्रोसेसर असेल. याची रॅम १६ जीबीपर्यंत तर स्टोअरेज एक टिबी इतके असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात इंटेल थंडरबोल्ट ३, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एलटीई, एचडीएमआय, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी आणि डिस्प्ले पोर्ट देण्यात आले आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ८९,६०० हजारांपासून असेल.

थिंकपॅड एल ४७०, थिंकपॅड टी ४७० व थिंकपॅड टी ४७०एस हे सर्व मॉडेल्स रफ युजसाठी लाँच करण्यात आले आहेत. यातील थिंकपॅड एल ४७० या मॉडेलमध्ये १८ तासांचा बॅटरी बॅकअप असेल. तर टी ४७० मध्येही संपूर्ण दिवसभर चालणारी बॅटरी तसेच एचडी/क्युएचडी डिस्प्लेंचा पर्याय असेल. या तिन्ही मॉडेल्सच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे ६७,९००; ८८,६०० आणि ९७,७०० रूपयांपासून सुरू होणारे असेल