fbpx

सत्तेचा उन्माद: त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा बुलडोझरच्या मदतीने पाडला

lenin tripura

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर येताच डाव्यांच्या श्रद्धास्थानावर आघात करायला सुरुवात केली असून दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला.

linen

बुलडोझर चालकाला दारु पाजली!
त्रिपुराचे पोलीस अधीक्षक कमल चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या मदतीने लेनिनचा पुतळा तोडला. बुलडोझर चालकाला दारु पाजण्यात आली होती.पोलिसांनी बुलडोझर चालकाला पोलिसांनी अटक केली असून, बुलडोझर सील करण्यात आले आहे.

दरम्यान,त्रिपुरात भाजपचं सरकार बनल्यानंतर राज्यभरात जवळपास सर्वच भागात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. भाजप आणि आयपीएफटीचे कार्यकर्ते हिंसा करत असल्याचा आरोप सीपीएमने केला आहे. त्रिपुरात निवडणूक जिंकल्यानंतर हिंसेच्या घटना घडणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या लोकशाहीवरील विश्वासाच्या दाव्याचा चेष्टा आहे, असे सीपीएमने म्हटले आहे.