दहशतवाद्याचा पुतळा आपल्या देशात कशाला- सुब्रमण्यम् स्वामी

नवी दिल्ली: लेनिन दहशतवादी होते, त्यांच्या पुतळा आपल्या देशात कशाला हवा? असं वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपाचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम् स्वामी यांनी त्रिपुरात सुरु असलेल्या वादात आणखी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. स्वामी यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काल भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचा उन्माद दाखवत त्रिपुरातील लेनिनचा पुतळ्याची तोडफोड केली होती.

२०१३ मध्ये त्रिपुरात डाव्या पक्षांच्या विजयानंतर कृष्ण देवनाथ या स्थानिक कलाकाराने ३ लाख रुपये खर्च करुन लेनिन यांचा पुतळा तयार करुन तिथे तो उभारला होता. त्रिपुरातील निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रशियन राज्यक्रांतीचे प्रणेते व्लादिमीर लेनिन यांच्या पुतळ्यावर बुलझोडर फिरवला. यामुळे त्रिपुरातील परिस्थिती चिघळली आहे. या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना स्वामी यांनी या वादाला आणखी खतपाणी घातलं आहे.

नेमकं काय म्हणाले स्वामी ?

‘लेनिन तर विदेशी आहे आणि एकप्रकारे ते दहशतवादीच आहे त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची देशात गरजच काय? तो पुतळा कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात ठेवावा आणि तिथेच त्याची पुजा करा’