मुंबई : काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपाने (bjp) दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीवर काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतल्यानंतर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपचे ५ तर महाविकासाआघाडीचे (Mahavikasaaghadi) ५ उमेदवार विजयी झालेत. मात्र काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या ट्विटमध्ये म्हणालेत कि, विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा माफिया सरकारचे दिवस भरले आहेत असे देखील सोमय्या म्हणालेत. तसेच भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे (Ram Shinde), श्रीकांत भारतीय(Shrikant Bharatiya), उमा खापरे(Uma Khapre), प्रवीण दरेकर(Praveen Darekar) आणि प्रसाद लाड(Prasad Lad) विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमश्या पाडवी (Amashya Padvi), राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) आणि एकनाथ खडसे(Eknath Khadse) तर काँग्रेसचे भाई जगताप (bhai Jagtap) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
Results of Legislative Council elections in Maharashtra means
Uddhav Thackeray's MAFIA Sarkar's days are over
विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल
उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारचे दिवस भरले @BJP4India@Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 20, 2022
महत्वाच्या बातम्या :