विधानपरिषद उपसभापती निवडणूक: भाजपच्या उमेदवाराचा अर्ज दाखल

bjp devendra fadnvis

मुंबई: मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार घोषित केला असून त्याचा अर्जही दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून भाई गिरकर तर महाविकास आघाडी कडून आमदार निलमताई गोर्हे यांनीही अर्ज दाखल केला आहे. आमदार कपिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती, भाजप त्यांना पाठिंबा देणार होतं पण आता भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याने एक वेगळी लढत बघायला मिळणार आहे.

विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ

शिवसेना- १४

राष्ट्रवादी काँग्रेस- ९

काँग्रेस- ८

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय.

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १

लोकभारती- १

अपक्ष- ४

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस हा वादळी ठरला आहे. ग्राम पंचायतीमध्ये प्रशासक नेमणूक करण्यात आली होती. त्याबद्दल सुधारणा विधेयक मांडण्यात आले. परंतु, भाजपने या विधेयकावर जोरदार आक्षेप घेतला.

कंगणावर देशद्रोहाचा खटला दाखल करा,शिवसेनाच्या या आमदाराचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना पुन्हा हे विधेयक का? जो वाद न्यायालयात आहे त्यावर अध्यादेश काढायची घाई का? असा सवाल उपस्थितीत केला होता.

‘दिड शहाण्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, तिची सर्व मालमत्ता सील करा’

तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला. तुमची माहिती अपूर्ण आहे. 5 वर्ष सरपंच कसा यावा, याबाबत नियम आहे. पण 5 वर्षांनंतर काय करावं याबाबत कायदा नाही, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले. परंतु, विरोधकांनी जोरदार गोंधळ करत सभात्याग केले.

कोरोना झालेला असताना ही त्यांनी काढला पळ, जायचे होते दानापूरला, पण पोहचले…