भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी : बापट

girish bapat

पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन व्हावे यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात आज विशेष बैठक घेतली. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी अशी सूचना विधी व न्यायविभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने विधी व न्याय विभागाचे उपसचिव श्री पाटील,नगरविकास विभागाचे संजय गोखले, महसूल व वनविभागाचे सहसचिव श्री गावडे, महापालिका उपायुक्त सतीश कुलकर्णी, तसेच स्मारक समितीच्या वतीने नगरसेवक महेश लडकत यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

२०११ मध्ये तत्कालीन सरकारी वकिलांनी भूमिसंपादन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा ताबा देण्याची प्रक्रिया रखडली आहे असे बापट यांच्याशी झालेल्या या चर्चेतून निर्देशनास आले. त्यामुळे या प्रकारातून तातडीने मार्ग काढाण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी विधी व न्याय खात्याला दिली. संबंधित पत्रावर विधी व न्याय खात्याचे मत लवकरात लवकर कळवावे अशी सूचना ही बापट यांनी यावेळी केली. सरकारी वकिलांशी चर्चा करून याबाबत माहिती देण्याचे विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री बापट यांना सांगितले.

Loading...

भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक आहे. हा विषय सर्वांसाठी महत्वाचा आहे. या आधी या संदर्भात काय -काय कामे झाली याची माहिती एकत्र करून मला द्यावी असा आदेश बापट यांनी या बैठकीत दिला. या विषयाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापुढील काळात कमीत कमी वेळेत होईल याबाबत नियोजन करा असे बापट यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी भिडेवाड्या संदर्भात २०११ नंतरच्या काळात झालेली दिरंगाई समजून घेऊन त्याबाबत श्री बापट यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशी दिरंगाई यापुळे खपवून घेणार नाही असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'