डाव्या विचारसरणीच्या माणसांचा नक्षलवादाकडे शिरकाव : गृह राज्यमंत्री दीपक केसरकर

दीपक केसकर

सिंधदुर्ग: कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे तसेच अनेक नागरिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. तसेच डाव्या विचारसरणीच्या माणसांनी नक्षलवादाकडे शिरकाव केला आहे. या नक्षलवाद्यांकडे आदिवासी समाजाचा एकही युवक भरती होत नसल्याने नक्षल संघटनांना मोठा धक्का बसला असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरेगाव भीमा हिंसाचारानातर पूर्ण राज्यात बंद पाडण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हिंसाचार व दगड फेकीच्या घटना देखील घडल्या. या संदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले, कोरेगाव भीमा येथे तीन ते चार लाख लोक दर्शनासाठी येथे आले होते. परंतु, या भाविकांपर्यंत दंगलखोरांना पोलिसांनी पोहोचू दिले नाही. हे चांगले काम पोलिसांनी केले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले नसल्याबाबतची माहिती चुकीची असून ३ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.Loading…
Loading...