fbpx

ललित दोषी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘परराष्ट्र धोरण’ विषयावर व्याख्यान

मुंबई : ‘ललित दोषी मेमोरिअल फाउंडेशन आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ललित दोषी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘परराष्ट्र धोरण’ या विषयावर माजी परराष्ट्र सचिव डॉ.एस.जयशंकर यांनी मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

परराष्ट्र धोरणामुळे भारत हा जागतिक पातळीवर अग्रेसर बनला आहे, असे मत डॉ. जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन होते.

यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, माजी सनदी अधिकारी अजित निंबाळकर, ललित दोषी मेमोरिअल फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिमा दोषी, फाउंडेशनचे विश्वस्त भारत दोषी आदी उपस्थित होते.

…. तरच सरकारी नोकरीत कायम स्वरूपी सामावून घेतल्या जाईल – देवेंद्र फडणवीस