‘अल्लाह’साठी बॉलीवूड सोडणाऱ्या, ‘या’ अभिनेत्रीने केला मौलवींशी निकाह

sana khan

मुंबई : खूप कमी वयातच झायरा वसीम प्रसिद्ध झाली होती. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अल्लाह के रास्ते से भटक गई थी… असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडले होते. यानंतर बॉलिवूडची अभिनेत्री सना खान हिने देखील ‘अल्लाह’साठी अभिनय सोडला होता.

सनाने बॉलीवूड सोडल्यांनंतर सनाची सर्वत्र चर्चा चालू होती. सनाने  बॉलीवूड मध्ये खूप कमी काम केले करिअरच्या अर्ध्यात येवून सनाने बॉलीवूड सोडले होते. सनाने बॉलीवूड मधून एक्सिट घेतल्यानंतर सनाचे चाहते नाराज झाले होते. पण ‘अल्लाह’साठी अभिनय सोडत आहे असे म्हणून सनाने बॉलीवूड मधून एक्सिट घेतली.

दरम्यान  सना आता लग्नामुळे चर्चेत आहे सना खानने शुक्रवारी रात्री मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला आहे. सूरतमध्ये हा निकाह पार पडला असून, सनाच्या या ‘निकाह’चे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सना व मुफ्ती अनस व्हाईट कलरच्या पोशाखात आहेत. एका व्हिडीओत सना केक कापताना दिसतेय.

महत्वाच्या बातम्या