नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडताय; मग तुम्हाला भरावा लागणारा इतका जीएसटी

नोटीस पीरियड

मुंबई: साधारणतः नोकरदारांना नोकरी सोडताना कमीत कमी 1 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. तर एखादा कर्मचारी मोठ्या पदावर असेल तर त्याला 3 किंवा 6 महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. मात्र, आता नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर तुम्हाला 18 टक्के GST भरावा लागणार आहे.

गुजरात मधील अहमदाबादमध्ये एका कार्माच्र्याने आपण कंपनीने दिलेला ३ महिन्यांचा नोटीस पिरीयड पूर्ण न करत अनोकारी सोडू इच्छित आहे अस सांगितल. यावेळी त्याने गुजराज अथॉरिटी ऑफ एडव्हान्स रुलिंग कडे तक्रार केली आहे. मात्र या प्रकरणात रुलिंग अथॉरिटीने नव्या नियमांनुसार, नोटीस पिरियड पूर्ण केला नाही तर कर्मचाऱ्याला आपल्या फुल अॅन्ड फायनलच्या रकमेतून 18 टक्के जीएसटी भरावा लागू शकतो अस सांगितलं आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याला अपॉन्ट्मेंट लेटर किंवा कॉन्ट्रॅक्ट लेटरनुसार घालून दिलेला नोटीस पिरियड पूर्ण करणं कायद्यानुसार गरजेचं आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडत असाल तर ही खबरदारी तुम्ही घ्यायला हवी नाहीतर १८ टक्के जीएसटी भरायला तयार राहा !

महत्वाच्या बातम्या