विधानसभेसाठी आरपीआयला १५ जागा सोडा : आठवले

गंगाखेड : आगामी विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या जागा सहा राज्यातील 15 जागा
महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सोडविण्याची मागणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सागितले.

नांदेड येथुन परळीला जात असताना ता.18 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वाजता गंगाखेड येथिल लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौकात काही वेळ थांबले होते. त्याच्या समवेत महाराष्ट्राचे सामाजीक न्याय राज्य मंत्री अविनाश महातेकर होते. यावेळी डाॅ.सिद्धार्थ भालेराव यानी स्वागत केले. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यानी डाॅ.सिद्धार्थ भालेराव याच्यासाठी गंगाखेड विधानसभेची जागा महायुतीकडे घेणार असल्याचे सागितले.

Loading...

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतची जागावाटपाची भाजप, शिवसेनासह महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून राज्यात एकूण 15 जागा रिपाईला सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. यामध्ये गंगाखेडची जागा डाॅ.सिद्धार्थ भालेराव यांच्या साठी आम्ही निश्चितच सोडून घेऊ असा विश्वास व्यक्त केला. केंद्रिय मंत्री रामदास आठवले यानी प्रथम लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर डाॅ. सिद्धार्थ भालेराव यानी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे मंत्री अविनाश महातेकर यांचा सत्कार केला. त्यानंतर लगेच मंत्र्याचा ताफा परळीकडे निघाला. या वेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ