#CoronaVirus : जाणून घ्या कोरोना विषाणूच्या लागणची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

टीम महाराष्ट्र देशा : कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु,तर ८३० जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. २९ प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या विभागात १ हजार ७२ नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

कोरोना विषाणूच्या लागणची लक्षणे

Loading...

कोरोना विषाणूच्या लक्षणांमध्ये वाहणारे नाक, खोकला, घसा खवखवणे, अधूनमधून डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश आहे, जो काही दिवस टिकू शकतो. दुर्बल प्रतिकारशक्ती असणार्‍या लोकांसाठी ते घातक आहे. वृद्ध आणि मुले याचा सहज बळी पडतात. न्यूमोनिया, फुप्फुसात सूज येणे, शिंका येणे, दमा होणे ही लक्षणेदेखील आहेत.

यावर उपचार काय?

अद्याप यावर कोणताही उपचार नाही. कोरोना व्हायरस (CoV) किंवा 2019-nCoV ची कोणतीही लस नाही. हे टाळण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे खबरदारी घेणे. आजारी असलेल्या- सर्दी, न्यूमोनियाच्या व्यक्तीशी संपर्क साधणे टाळा. एक मास्क घाला. डोळे, नाक आणि तोंडाला जास्त स्पर्श करू नका. साबणाने हात चांगले धुवा.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगितले आहे, असे संयुक्त राष्ट्र संघटनेनेही ट्विट केले आहे. ट्विटमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी करण्याच्या उपायांची रूपरेषा देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. मुंबई येथे पत्रकारांनी त्यांनी ‘कोरोना’बाबत विचारलं असता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘चीनमध्ये लागण झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात नसल्याची माहिती टोपे यांनी यावेळी बोलताना दिली.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तपासणी केलेल्या प्रवाशांपैकी मुंबईतील 2 प्रवाशांना घरी गेल्यानंतर सौम्य सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार