डिजिटल युगाला सामोरे जाताना डिजिटायझेशनची भाषा शिका – डाॅ. मोहन आगाशे

पुणे – एकविसाव्या शतक हे डिजिटल युग आहे आणि या युगाला सामोरे जात असताना डिजिटायझेशनची भाषा न शिकल्यास आपल्याला स्पर्धेच्या बाहेर पडावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाला ही भाषा शिकावीच लागेल असे मत ज्येष्ठ अभिनेते डाॅ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 17 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात डाॅ. मोहन आगाशे यांच्या दृकश्राव्य आणि प्रकट प्रश्नोत्तराद्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

विविध चित्रफती दाखवत डाॅ. मोहन आगाशे त्या चित्रफतींचे विश्लेषण करुन सांगताना म्हणाले की, जेव्हा भाषेचे आस्तित्व नव्हते तेव्हा चित्रभाषा आणि संकेताच्या भाषेव्दारेच संवाद साधला जायचा आणि व्यवहार केले जायचे. त्यालाच आपाण आजच्या भाषेत नाॅन फाॅर्मल भाषा म्हणतो. चित्र आणि संकेतांच्या भाषेव्दारे नेणीवेच्या पातळीवर संवाद साधला जात असल्याने ती प्रभावी होत असे.

भानावर नसताना आणि शुद्धिवर असताना चित्रांची भाषा थेट नेणीवेच्या पातळीवर संवाद साधत असते. आताच्या मोबाईलच्या युगात समाज माध्यमांवरही आपण संवाद साधताना अनेकदा इमोशन्सचा उपयोग करुनच आपल्या भावनांचे प्रकटीकरण करीत असतो, असे ते म्हणाले.