जाणून घ्या बदामाचे आरोग्यदायी फायदे

टीम महाराष्ट्र देशा : सुकामेवा मधील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बदाम. बदामाचे काही आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. बदाम खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्याने नैसर्गिकरीत्या रक्तदान प्रमाणात राहण्यास मदत होते. रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने ज्यांना मधुमेह आहे त्याचा थकवा दूर होतो. जेवण झाल्यानंतर बदाम खाल्ल्याने आणि इन्शुलिनचे प्रमाण वाढण्यापासून रोखले जाते. ज्यामुळे मधुमेह होण्यापासून बचाव होतो. बदामामध्ये क्यालरीज कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते.

वारंवार लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण सुद्धा राहते. लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे मेटाबोलिक सेंटर या वरती बदाम नियंत्रण ठेवतात. बदामातील एंटीऑक्सीडेंट घटक शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.त्यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होतो. आणि हृदयविकारापासून ही बचाव होतो.

नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते. बदामामध्ये जीवनसत्वे अ जास्त प्रमाणात असल्यामुळे जरा चिरतरुण होण्यास मदत होते. दररोज चार ते पाच बदाम मुलांनी खायला हवे त्यामुळे बुद्धीला चालना मिळून स्मरणशक्ती वाढते. बदामामुळे रोग प्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे आजारीपण त्याचप्रमाणे कमी होते.

भिजवलेल्या बदामाच्या सालीमधील गुणधर्मांमुळे शरीरातील मेद कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपली पचनशक्तीसुधारते. तुम्हाला सर्दी आणि परशा चा त्रास होत असेल तर नक्की खात भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते. बदामाची साल कोरडी असल्याने बऱ्याच वेळा आपण ते काढून टाकतो. पण ही चाल शरीरातील रक्त पातळी वाढविण्यास मदत करते. त्यामुळे बदाम हे नेहमी सालासकट खाल्ले पाहिजे.

पैसे केस गळती वर रामबाण उपाय म्हणजे बदाम खाल्ल्याने केस गळण्याचे प्रमाणही कमी होते. गरोदर स्त्रियांनी नियमितपणे भिजवलेले बदाम खायला हवेत यामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होण्यास मदत होते. बदामाचे असलेले फॉस्फरस हाडांना आणि दातांना बळकटी देते. त्यामुळे हाड आणि दातांशी संबंधित असलेले आजार होण्याचा धोका कमी होतो.  त्यामुळे अशा बहुगुणकारी बदामाचा आपल्या आहारात समावेश करा.