जाणून घ्या तुळशीचे घरगुती फायदे

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय प्रणालीमध्ये तुळशीला सर्वरोगनाशक असं समजलं जात. तुळशीला वनस्पतींची राणी असे म्हणलं जात. आपल्या आरोग्यासाठी तुळशी अत्यंत गुणकारक ठरते.

सर्दी, खोकला, स्वाइन फ्लू, डेंग्यू , मलेरिया, टीबी, कॅन्सर, रक्तदाब, केसांचे-त्वचेचे त्रास, पोटाचे विकार, किडनी स्टोन अशा अनेक आजारांवर तुळस परिणामकारक ठरते. तसेच अनेक प्रकारच्या तुळशीचा अर्क कॅन्सर सारख्या आजारांवर उपयुक्त ठरते. कॅन्सर पासून आराम मिळवण्यासाठी एक ग्लास ताकात दोन थेंब तुळशीचा अर्क घालून दररोज घेतल्यास आराम मिळतो. याच प्रमाणे तुळशीचा रस खाज, खरुज, चट्टे त्वचेच्या विकारांवर परिणामकारक ठरत.

याचप्रमाणे किडा चावल्यास, जखम झाल्यास, पिंपल्स, काळे डाग यावर तुळशीचा रस लावल्याने आराम मिळतो. डोकेदुखी, केस गळणे, केस पिकणे, कोंडा होणं यावर तुळशीचा अर्क परिणामकारक ठरतो.

तसेच घसा दुखत असेल किंवा घसा बसला असेल तर गरम पाण्यात तुळशीच्या अर्काचे थेंब घालून गुळण्या कराव्यात. कान दुखत असतील तर तुळशीचा रस गरम करून कानात एक-दोन थेंब घातल्याने आराम मिळतो.

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामुळे गावांच्या विकासाला चालना

 

आधी अजितदादांच्या मांडीला मांडी, नंतर शिवस्वराज्य यात्रेचे काढले वाभाडे

 

#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता