शिस्त काय असते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका : काँग्रेस नेते

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस कार्यकर्त्यांनी विदिशामध्ये कार्यक्रमात खुर्च्यांवरुन गोंधळ घातला. कारण शाही घराण्याचे सदस्य असलेल्या सिंधू विक्रम भवार बाना यांच्यासाठी खुर्ची नव्हती. बाना मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक आहेत. मात्र बैठकीत खुर्ची न मिळाल्यानं ते नाराज झाले. याबद्दल काँग्रेस नेते मेहमूद कामिल यांनी जिल्हा अध्यक्षांकडे तक्रार केली. यानंतर उपस्थितांमध्ये वादावादी झाली आणि बैठकस्थळी गोंधळ उडाला. त्यावेळी शिस्त काय असते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका, असा सल्ला काँग्रेस नेते दीपक बाबरिया यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

संघाचं कौतुक करून बाबरिया त्यांच्या शब्दांवर ठाम आहेत. संघाच्या शिस्तीचं उदाहरण देण्यात काहीही गैर नाही, असंही बाबरिया म्हणाले. ‘पंडित नेहरुंनी ज्याप्रकारे संघाचं कौतुक केलं होतं, त्याचप्रकारे मी संघाचं कौतुक केलं आहे. चीनविरुद्धच्या युद्धावेळी नेहरुंनी मुक्तकंठानं संघाच्या शिस्तीची स्तुती केली होती. जर कोणी चांगलं काम करत असेल, तर त्यांचं कौतुक करण्यात गैर काय?’, अस बाबरिया म्हणाले.

हार्दिक पटेल करेल संघ पद्धतीने प्रचार, पटेल संघाचा माजी स्वयंसेवक

नमाजाला भोंगे कशाला पाहिजे? घरीच नमाज पठण करा – राज ठाकरे