fbpx

जाणून घ्या प्रिया प्रकाश वरियर सोबत असणाऱ्या अभिनेत्याविषयी

roshan

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. प्रिया प्रकाश वरियर या अभिनेत्रीच्या मोहक अदेची. प्रिया वरियर हिचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. डोळ्यातून प्रेम व्यक्त करत या व्हिडीओ मधील जोडप्याने स्वताचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. या व्हिडीओ मध्ये प्रिया वरियर हिच्या सोबत असणारा मुलगा कोण असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असले.

roshan-abdul-oru-andaa-love-priya-prakash-varrier

‘मनिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे प्रियाला असंख्य चाहत्यांची पसंती मिळाली. प्रिया आणि तिच्यासोबत दिसणारा अभिनेता अवघ्या काही सेकंदांसाठी दिसत आहेत. पण, त्यांच्या नात्यातील खोडकरपणा आणि त्यातून झळकणारं प्रेम या गोष्टी नेटकऱ्यांच्या मनाला भावल्या आहेत. काहींनी तर प्रियाचे फोटो मोबाईल आणि लॅपटॉपवर स्क्रीनसेव्हर म्हणूनही ठेवले आहेत. प्रियाप्रमाणेच तिच्यासोबत दिसणारा ‘तो’सुद्धा सध्या प्रकाशझोतात आला आहे. तिच्या हसण्याने घायाळ झालेल्या त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून अनेकांच्या मनात काही आठवणीसुद्धा जाग्या झाल्या आहेत.

abdull

मोहम्मद रोशन किंवा रोशन अब्दुल रहूफ या नावांनी तो ओळखला जातो. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय आहे. या दोघांनी तरुण विश्वाला नजरेने घायाळ केले आहे. प्रिया बरोबरच या मोहम्मद रोशन यानेही उत्तम काम केल आहे. व्हिडीओ ची प्रसिद्धी पाहता या दोघांच्या ‘उरु अदार लव्ह’ या आगामी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची लक्षण आहेत.

malyalam