fbpx

पंढरपूरात नेत्यांचे दौरे, विठ्ठल नक्की पावणार कोणाला ?

टीम महाराष्ट्र देशा –  विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना अजून बराच कालावधी बाकी असला तरी राज्यातील सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. त्यातच राज्यात दुष्काळस्थितीमुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर येत्या पंधरा दिवसांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर मध्ये येत आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंढरपुरात आले होते. त्यांनी पंढरपूरात येऊन विठ्ठल दर्शन घेवून सत्ताबदलासाठी विठ्ठलाला साकडे घातले होते.

पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 17 डिसेंबर रोजी राज्य शासनाने बांधलेल्या तुळशी वनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंढरपुरात येणार आहेत. विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची येत्या 24 डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पंढरपुरात होणाऱ्या जाहीर सभेची तयारीही सध्या सुरु आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने मंत्री,आमदार आणि खासदार ही पंढरपुरात येणार आहेत. ठाकरेंच्या सभेमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

याच दरम्यान कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. तर बहुजन वंचित आघाडीची प्रकाश आंबेडरकर यांची सभा देखील होणार आहे. निवडणुका जश्या जश्या जवळ येतील तसे राजकीय नेत्यांचे दौरे देखील वाढतील. पण पंढरपूरचा विठ्ठल नक्की कोणाला पावणार हे मात्र येणारा  काळच सांगेल.

माढ्यातून धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा.