नेत्यांनी मतदानासाठी ऊसतोड कामगारांसमोर परसले हात

grampanchayat

बीड – लॉकडाऊनच्या काळात ऊसतोडणी करून परतणाऱ्या कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावेळी कामगांराच्या जीवाचे आतोनात हाल झाले. त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या अनेक गावातील नेतेमंडळींवर आता गावची निवडणूक असल्याने कामगारांना मतदानासाठी येण्याची विनंती करत होत पसरण्याची वेळ आली आहे.

बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. या निवडणुकीत १ हजार ८४८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मतदान काही तासांवर आल्याने स्थानिक नेतेमंडळींनी मतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. मात्र, निवडणूक होऊ घातलेल्या बहुतांश गावात कमी-जास्त प्रमाणात ऊसतोड मजूर हे कारखान्यावर उसतोडणीसाठी गेलेले आहेत.

या मजुरांनी मतदानासाठी यावे, यासाठी आता राजकीय नेतेमंडळींची पळापळ सुरू झाल्याचे चित्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये मजुरांचे मते निर्णायकही ठरू शकत असल्याने काही जण वाहनांची सोयही करत आहेत. वास्तविक लॉकडाऊन काळात हे मजूर जेव्हा ठिकठिकाणी असलेल्या अडथळ्यांचा सामना करत असताना हे गावचे पुढारी मात्र त्यांची साधी विचारपूसही करत नव्हते. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी होती. ही नाराजी मतदानामधून व्यक्त होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या