नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला

hasan mushrif vs chandrakant patil

कोल्हापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर झाले असून शिवसेना व भाजप यांच्यात अव्वल स्थानासाठी काटे की टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.

या निकालांवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. यावर देखील हसन मुश्रीफ यांनी भाष्य करताना, ‘उद्या भाजपचेच नेते म्हणतील दादा तुमच्याच गावात तुमची सत्ता नाही’ अशी मिश्किल टिपणी देखील हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या